बारामती दर्पण प्रतिनिधी
कोऱ्हाळे बुद्रुक:

 बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात लाटे गावातील प्रसिद्ध असलेल्या आईसाहेब मंदिरात आज गुरुवारी पहाटे चोरी झाली आहे. आई साहेबांचा मुकुट, सोने चांदीचे दागिने, असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. मकर संक्रातीच्या तोंडावर मंदिरातील चोरी झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आईसाहेबांचा मुकुट, सोने-चांदी, असा ऐवज मंदिरातील चोरीला गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. 
    बारामती तालुक्यात शिरसुफळ येथील शिरसाई मंदिरात मागील चार दिवसांपूर्वीच अशीच घटना घडली होती. मात्र बारामती पोलिसांनी चोवीस तासाच्या आत या घटनेचा छडा लावून चोरट्यांना गजाआड केले होते. बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील आईसाहेब हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे. लाटे गावाच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात रात्री चोरीची घटना घडल्याने ग्रामस्थांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. या घटनेबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. 

Post a Comment

أحدث أقدم