बारामती दर्पण (प्रतिनिधी)
वडगाव निंबाळकर:
        वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे काळखैरेवाडी गावचे हद्दीत ग्रामदैवत मिरवणुकीत विनापरवाना वाद्य वाजवणे डी.जे मालकाला चांगलेच महागात पडले आहे. विनापरवाना डी.जे वाजविले वरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी टाटा कंपनीच्या मॉडीफाईड वाहन क्रमांक MH 12 AU 3059 या वाहनाची तपासणी होऊन कायदेशीर कारवाई होण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांचेकडे  अहवाल सादर केला होता. प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पाहणी करून या वाहनास एक लाख आठ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
          नंदकिशोर पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती यांनी सदर वाहनाची तपासणी केलेनंतर त्रुटी आढळलेने मॉडीफाईड डी.जे वाहनास १,०८,००० दंड केला आहे.
    सदरची कारवाई सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी केलेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم