बारामती दर्पण प्रतिनिधी
बारामती (संदिप आढाव)

माळेगाव बुद्रुक येथे सुनीलभाऊ खिलारे मित्र मंडळाच्या वतीने कै विकास प्रतापराव सातपुते यांच्या स्मरणार्थ क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे चषक या नावे श्वान शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या श्वानांच्या धावण्याच्या शर्यतीचा शुभारंभ अ‍ॅड.राहुल तावरे यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे आणि कै. विकास सातपुते यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
या कार्यक्रमास रोहित सातपुते, सुयोग सातपुते, प्रतापराव सातपुते, नितीन तावरे, शामराव सातपुते, रविराज तावरे, इम्तियाज शेख, शौकत शेख, कुलदीप तावरे, बंटीराज चव्हाण, वसंतराव पैठणकर, बंटी गोफणे, गणेश विटकर, चेतन मोरे, आकाश शिंदे, कुणाल सकट, राजू गायकवाड, बाळा साठे, बबलू सातपुते, सुरज अडागळे, दत्तात्रय भंडलकर, गणेश खरात, रामा अवघडे इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश महागावकर यांनी केले. या स्पर्धेसाठी विविध जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून शंभर श्वान सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post