बारामती दर्पण टीम

जेजुरी प्रतिनिधी - कल्याणी भोसले - जगताप
 
जेजुरी शहरातील विद्यानगर भागातील साईनगर ते  खंडोबा पालखी रोड येथील रहिवाश्यांचा  पाणीप्रश्न मार्गी लावण्यात आजी माजी नगर सेवकांना यश मिळाले आहे.
 जेजुरी येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये विद्या नगर – साईनगर - दरेकर सोसायटी व खंडोबा पालखी रोड परिसर या ठिकाणी गेली अनेक वर्षे येथील नागरिकांना पिण्याच्या  पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. गेली काही वर्षापासून येथील नागरिकांना पिण्याचे पाण्याचे  कनेक्‍शन देखील  नव्हते. बऱ्याच  दिवसापासून रखडलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काँग्रेस सत्ताधारी गटाने लक्ष घालून अंदाजे रक्कम पाच लाख खर्चून नवीन पाईप लाईन शिवानंद हॉटेल पासून  दरेकर सोसायटी मधील रहिवाश्यांनी स्वखर्च वर्गणीतून टाकलेल्या सुनील जगताप घर ते दरेकर सोसायटी प्रवेशद्वार या भागातील पाईप लाईन ला जोडून तेथून पुढे सोसायटी प्रवेशद्वार पासून पुढे  गिरीश राऊत घर हे काम पूर्णत्वास केले.  या प्रभागाचे माजी स्वीकृत नगरसेवक योगेश जगताप  आणि नगरसेविका पौर्णिमाताई राऊत , नगरसेवक बाळासाहेब दरेकर यांनी पाठपुरावा करून तसेच  जेजुरी नगरीच्या  नगराध्याक्षा  वीणाताई सोनवणे यांनी लक्ष घालून त्वरित निधी मंजूर केला. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. त्याबद्दल येथील नागरिकांनी नगराध्यक्षा वीणाताई सोनवणे व माजी नगरसेवक योगेश जगताप यांचे कौतुक केले आहे . यावेळी उपस्थित नगराध्यक्षा वीनाताई सोनवणे, माजी नगरसेवक योगेश जगताप , नगरसेविका पौर्णीमा राऊत ,बाळासाहेब दरेकर ,वैभव झगडे , किशोर भगत, पाणी विभागाचे अधिकारी व येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते. आजी माजी नगर सेवकांच्या एकत्रित प्रयत्नामुळे पाणी प्रश्न सुटल्याने या भागातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे

Post a Comment

Previous Post Next Post