बारामती (विशेष प्रतिनिधी-संदिप आढाव)

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचा वाढदिवस दि. ०५ जुलै रोजी पार पडला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केले गेलं होतं. माळेगाव, तालुका बारामती येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रहार अपंग क्रांती संस्थेचे माळेगाव चे शाखा अध्यक्ष मधुकर वायकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे अवचित्त साधून माळेगाव कार्यक्षेत्रामधील मंदिरांची व परिसराची साफसफाई केली. तसेच माळेगाव येथील हॉटेल शिवनेरीमध्ये चालू असलेल्या शिवभोजन ठिकाणी अपंग क्रांती संस्थेच्या वतीने 300 लाडू देण्यात आले व केक कापून अपंग बांधवांनी बच्चू कडू यांना शुभेच्छा दिल्या तसेच माळेगाव चे जुने बस स्थानक परिसरामध्ये मिठाई व केक चे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाला माळेगाव चे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांनी सहकार्य केले होते. 

अकोला जिल्ह्यातल्या अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांची शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग जणांसाठी काम करणारा नेता म्हणून राज्यभर ओळख आहे. त्यांच्या न्याय हक्कांसाठी राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात जाऊन आंदोलन करुन त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आतापर्यंत बच्चू कडू यांनी केलंय. बेघर आणि अपंग लोकांसाठी बच्चू कडू यांचं मोठं काम आहे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला प्रहार अपंग क्रांती संस्था विविध कार्यक्रमांचं आयोजन करते. या वर्षीदेखील माळेगाव येथे प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होत.
माळेगाव येथील वाढदिवसा निमित्त झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे बारामती तालुका अध्यक्ष धनवान वदक, माळेगाव चे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे, शिवसेनेचे बारामती तालुका अध्यक्ष विश्वास मांढरे, राष्ट्रवादी सोशल मिडिया सेल चे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस प्रदिप जगदाळे, राष्ट्रवादी चे बारामती तालुका युवा उपाध्यक्ष दादा जराड, अपंग क्रांती संस्थेचे बारामती तालुका कार्याध्यक्ष संजय अहिवळे, बारामती शहराध्यक्ष प्रशांत गायकवाड, शहर उपाध्यक्ष अजिज शेख, संस्थेचे माळेगाव शाखेचे उपाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, योगेश भोसले, रविंद्र गोफणे, रविंद्र तावरे, धुमदेव मदने, कैलास शिंदे, शिवाजी पवार, विष्णू गायकवाड, सूरज मोरे, नाना नलगे, विजय मोरे, तेजश्री शितोळे, सचिन गदादे, साईराज राऊत, सूरज गायकवाड, बळीराज गायकवाड, भैरुनाथ गायकवाड, बाबू गायकवाड,   इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم