सोलापूर ( विशेष प्रतिनिधी- संदिप आढाव)
महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ चे प्रदेशाध्यक्ष राजेंद्रशेठ खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली बार्शी, जि. सोलापूर येथे संघटनेची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये समाजाच्या आरक्षण फाईल ची माहिती देण्यात आली तसेच आरक्षणासह समाजाच्या इतर विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये करमाळा, जि. सोलापूर येथील प्रियांका सागर गायकवाड यांची महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ च्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षपदी निवड झाली. प्रियांका गायकवाड यांनी पूर्वी समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्षा पद भूषविले आहे. अतिशय तळमळीने काम करण्याची त्यांची पद्धत पाहून त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली. प्रियांका गायकवाड ह्या शिवसेना पक्षाच्या करमाळा तालुका महिला अध्यक्ष पदावर कार्यरत असून पक्ष कार्य करत असताना पक्षाच्या माध्यमातूनही समाजाच्या अडी-अडचणी सोडवण्याचे व समाजाची बाजू शासन दरबारी मांडण्याचे काम त्या वारंवार करतात. तसेच त्यांनी शिवकन्या सुरक्षा समिती नावाने संस्था स्थापन केली असून या माध्यमातून समितीमध्ये आपल्या सोबत सहभागी असलेल्या सहभागी महिला भगिनींना सोबत घेऊन समाजातील महिला व मुलींना सक्षमीकरण करण्याचे तसेच त्यांच्या अडी-अडचणी सोडवण्याचे काम करतात. प्रियांका गायकवाड यांच्या समाज संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष नियुक्ती ने जिल्ह्यातील सर्व बांधव समाधानी झाले असुन त्यांचेवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परीट सेवा मंडळ च्या झालेल्या या बैठकीमध्ये इतर काही समाजसेवकांच्याही संघटना कामामध्ये संघटना-पदावर संघटना पदाधिकारी व समाजबांधव यांच्या चर्चेतून नियुक्त्या झाल्या यामध्ये महाराष्ट्र परीट सेवा मंडळ च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी संजय घोडके, प्रदेश युवा अध्यक्षपदी रवी राऊत, सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी अजय सोनटक्के, तसेच सोलापूर जिल्हा युवा अध्यक्षपदी जयप्रकाश ननवरे यांची नियुक्ती झाली. व नियुक्ती नंतर सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ चे मुंबई-ठाणे विभागीय महासचिव संतोष सवतीरकर, वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष मुरलीधर शिंदे, शांतीलाल कारंडे, संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार सुधिर खैरनार, लॉंड्री संघटना ज्येष्ठ मार्गदर्शक प्रभाकर कारंडे, संघटनेचे सोलापूर जिल्हा मार्गदर्शक नामदेव वाघमारे, शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनेचे प्रदेश संघटक दयानंद पवार, सोलापूर जिल्हा सचिव दत्तात्रय क्षीरसागर, जिल्हा कार्याध्यक्ष सावता वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र लोंढे, तंटामुक्ती समिती चे प्रदेश उपाध्यक्ष देवा नवले, करमाळा तालुका अध्यक्ष बंडू शिंदे, पंढरपूर तालुका अध्यक्ष गणेश ननवरे, पंढरपूर शहर अध्यक्ष तथा पंढरपूर चे नगरसेवक विजय वरपे, पंढरपूर शहर अध्यक्ष रामेश्वर साळुंके, मंगळवेढा तालुका अध्यक्ष पंडित गवळी, मोहोळ तालुका अध्यक्ष नाना घोडके, अकोला जिल्हा महिला अध्यक्षा विद्या सरसे, सोलापूर जिल्हा महिला कार्याध्यक्षा मिनाक्षी पवार, सुभाष ननवरे, सुनिल सावरे, सागर गायकवाड, महावीर राऊत, अभिजित नवले, बापू ईशी, दशरथ सवणे, धनंजय ताटे, पांडुरंग राऊत, सचिन शिंदे, वैभव ननवरे, रविंद्र तरटे, नितिन शिंदे, उत्तरेश्वर कारंडे आणि इतर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
إرسال تعليق