बारामती दर्पण टीम
 मूर्टी (प्रतिनिधी) - कल्याणी भोसले - जगताप

बारामती येथील विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी अक्षय पोपट जगदाळे याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
    अक्षय हा मुर्टी गावातील एक होतकरू तरुण व सामाजिक कार्यकर्ता आहे. गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना नेहमी मदतीचा हात देणारा अक्षय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रभागी असतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या परेडसाठी अक्षय ची निवड झाल्याने  मुर्टी गावाचे नाव देशाचा पटलावर चमकले होते. अक्षय हा उच्च विद्या विभूषित तरुण असून त्याचे शिक्षण एमएससी भौतिक शास्त्र झाले आहे. अक्षय उत्तम वक्ता असून दोन वर्षांपूर्वी कोल्हापुरात आलेल्या महापुरात अक्षयने जीवाची बाजी लावत मदतकार्य केले होते. अक्षयने राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. अक्षय ला मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم