मुर्टी प्रतिनिधी - कल्याणी भोसले - जगताप 

दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोढवे येथे भरणारी मरिमाता देवीची यात्रा
राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता रद्द करण्याचा निर्णय श्री मरीआई देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
 ग्रामस्थ मंडळाने कोरोनाचा संसर्ग आणी संक्रमण टाळण्यासाठी भाविकांच्या आरोग्याचा दृष्टिने खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा रद्द करण्यात आली आहे.
 दरवर्षी आषाढ महिन्यात पौर्णिमेनंतर ही यात्रा करण्यात येते. यावेळी गावाच्या वेशीच्या रस्त्यावरून वाजत गाजत देवीचा वेडा काढण्यात येतो. यावेळी  मरिमातेचे भक्त पोतराज मरीआईचा उपासक वा भक्त असून त्याच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते, अशी सर्वत्र समजूत आहे. गावात आलेल्या साथीच्या शमनार्थ मरीआईचा गाडा गाव सीमेपर्यंत नेतात हा गाडा गावसीमेपर्यंत नेण्याचा धार्मिक कार्यक्रम होतो. त्यामुळे गावातून साथीचे आजार सीमेपार जाते अशी लोकश्रद्धा आहे. यावेळी भाविक भक्त देवीला विविध नवस करतात व ते मोठ्या श्रद्धेने फेडतात. मात्र  यावर्षी देवीचा पूजापाठ व विधी परंपरेनुसार करण्यांत येणार आहेत.
पंचक्रोशीतील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मरीमाता यात्रेच्या निमित्ताने आजू बाजूच्या गावातील लोक या यात्रेला उपस्थिती लावतात. कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी येथील मरीमाताची यात्रा रद्द झाल्याने पंच क्रोशीतील भाविक भक्तांच्या आनंदावर विरजण पडले असून, किमान पुढच्या वर्षी तरी मरिमातेचा यात्रा उत्साहाने साजरी करण्यात यावी असे गाऱ्हाणे मोढवे गावातील ग्रामस्थ व भक्त देवी कडे मागत आहेत .

Post a Comment

أحدث أقدم