सुपे: वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन तर्फे एक हात मदतीचा या धर्तीवर अनेक गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे. आज सुपे परिसरात ८ते १० गरीब कुटुंबांना या किटचे वाटप करण्यात आले.यावेळी सुपे पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक एस.जी शेख साहेब, पोलीस हवालदार शेंडगे , सामाजिक कार्यकर्ते प्रेम विलास फडे, राजकुमार लव्हे , यांच्या सहकार्याने ही मदत गरीब कुटुंबांच्या घरपोच करण्यात आली.लॉक डाउन काळात हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांची दोन वेळेची भूक भागवणे ही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या कर्मचाऱ्यांनी माणुसकी जपत अशा गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करून आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. लॉक डाऊन काळात ही मदत मिळाल्याने या कुटुंबाने ही पोलिस बांधवांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم