मोरगाव : उद्या दि .१९ पासून सुरू होणाऱ्या मुर्टी , तरडोली , मोरगाव या  गावातील भैरवनाथ यात्रा उत्सव कोरोना या  विषाणुजन्य आजाराचा वाढता फैलाव  लक्षात घेता रद्द केला आहे . यात्रा  उत्सव कमिटी मार्फत जनजागृती करून यात्रा रद्द  भरणार नसल्याने  मंदिर परीसरात न येण्याचे आवाहन केले आहे .
ग्रामीण भागात  दरवर्षी भैरवनाथ यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न केला जातो . ग्रामीण पट्ट्यामध्ये हा एकमेव मोठा उत्सव असल्याने गावातील तरुण वर्ग उस्फूर्तपणे  सहभाग घेत असतात . या दिवशी मंदिरावर तसेच गावात संपूर्ण विद्युतरोषणाई केली जाते . तसेच पाहुण्यांसाठी गोड -  तिखट जेवणाचा बेत आवर्जून आखला जातो .
गावामध्ये यात्रेच्या पहील्या दिवशी सायंकाळी  जोगेश्वरी व श्री नाथनाथ यांचा विवाह सोहळा संपन्न होतो . या विवाहाला हजारोंच्या संख्येने भक्त उपस्थित असतात
 मात्र गेल्या वर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशासनाने सार्वजनिक उत्सव संपन्न करण्यास  परवानगी नाकारली आहे . यामुळे तरडोली  गावात दवंडी व विविध  व्हाट्सअप ग्रुपच्या आधारे यात्रा  उत्सव रद्द झाला  असल्याची माहिती तरडोली गावचे सरपंच नवनाथ जगदाळे यांनी दिली आहे . तरडोली व मुर्टी येथील  भैरवनाथ यात्रा उत्सवा उद्या दिनांक 19 व 20 रोजी  तर मोरगाव येथील भैरवनाथ यात्रा उत्सव 20 व 21 रोजी संपन्न होणार होता. मात्र कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे हा उत्सव रद्द करण्यात आला आहे.

  सलग दुसऱ्या वर्षी  मोरगाव येथे भैरवनाथ यात्रा  उत्सव भरणार नाही . कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करावे  तसेच  श्रींस  घरातूनच   नैवेद्य दाखवावा 

निलेश केदारी : सरपंच ग्रामपंचायत मोरगाव 

.....................................................

 कोरोनाचा फैलाव  ग्रामीण भागात  वाढत चालला आहे . यामुळे प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी  भैरवनाथ मंदिर परिसरात ,   गावांमध्ये  घोळक्याने एकत्र येऊ नये . यात्रेनिमित्ताने गावात पै - पाहुणे बोलवु नयेत 

नवनाथ जगदाळे - सरपंच ग्रामपंचायत तरडोली 

..................................................

Post a Comment

أحدث أقدم