बारामती- बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून एकरी पन्नास हजार रुपये द्यावेत अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.
बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आठवले आज बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आठवले म्हणाले, केंद्राकडून मदत देण्यासाठी मी पंतप्रधान व केंद्रीय अर्थमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. मात्र राज्य शासनाची प्रथम जबाबदारी असून राज्याने तात्काळ मदत द्यावी.खडसे यांच्या पक्षप्रवेश बाबत बोलताना आठवले म्हणाले की, खडसे १६ आमदार घेऊन बाहेर पडतील असे होणार नाही. मात्र खडसे यांना पक्षात बदलायचा होता तर त्यांनी रिपाइं मध्ये यायला पाहिजे होते मात्र ते राष्ट्रवादीत गेले त्यांना आमच्या शुभेच्छा.

Post a Comment

أحدث أقدم