सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने कोरोना काळात चांगले काम करणाऱ्यांचा कोविड योद्धा पुरस्कार देत सत्कार करण्यात आला.
नेहरू युवा केंद्र पुणे व सदोबाची वाडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा तरुण मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यशवंत मान खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच विलास होळकर होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमोद मोरे यांनी, सूत्रसंचालन अनिल गवळी यांनी तर आभार विशाल होळकर यांनी मानले.
कार्यक्रमातील सत्कारमूर्ती पुढील प्रमाणे - डॉ प्रफुल बाबर, डॉ. अक्षय अलगुडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश कवितके, पोलीस हवालदार बी पी शेंडगे, पोलीस नाईक बाळासाहेब पानसरे, विलास होळकर, मोरेश्वर गाडे, दत्तात्रय चव्हाण, शंकर होळकर, हेमंत गडकरी, अमोल गायकवाड, अरुणा आगम, विजय कोळपे, अनिल गवळी, ज्योती ठोंबरे, अमोल भिसे, युनूस शेख, विशाल होळकर, सोमनाथ साळुंखे.
إرسال تعليق