पणदरे (दि:१९) शेतीला जोडधंदा म्हणून आजकाल बहुतांश लोक कुक्कुटपालन व्यवसायाला पसंती देत आहेत. याच उद्देशाने कृषी महाविद्यालय बारामती येथे अंतिम वर्षात शिकणारा हर्षल राजेंद्र जगताप याने पणदरे गावामध्ये शेतकऱ्यांना ग्रामीण कृषिकार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कुक्कुटपालन लसीकरणाबाबत मार्गदर्शन केले. 
       या कार्यक्रमामध्ये त्याने छोटे पक्षी तसेच मोठे पक्षी यांना वेगवेगळ्या रोगावरील लसीकरण आणि दोन लसीकारणांमधील कालावधी किती असावा याबाबत मार्गदर्शन केले. पक्ष्यांच्या वाढीसाठी कोणते खाद्य द्यावे याची त्याने थोडक्यात माहिती दिली आणि शेतकऱ्यांना कुक्कुटपालन व्यवसायाबाबत माहिती दिली. 
‌       या कार्यक्रमाला परिसरातील विविध नागरिक व कुकुटपालक उपस्थित होते .  या कार्यक्रमासाठी हर्षल जगताप याला महाविद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले.

Post a Comment

أحدث أقدم