वडगाव निंबाळकर - प्रतिनिधी

गेल्या आठवड्यात मुलीवर बलात्कार करणाऱ्या सावत्र बापाला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी काही मिनिटातच जेरबंद केला मात्र हा आरोपी सराईत गुन्हेगार निघाला आहे. यापूर्वीही त्याच्याविरोधात लातूर येथे एटीएम फोडल्याचा गुन्हा दाखल असून गेल्या सहा वर्षांपासून तो फरार आहे.

    मोरगाव जवळ असलेल्या शेराची वाडी येथे एका सावत्र बापाने नऊ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मात्र पीडित मुलीच्या आईने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आपल्या दुसऱ्या पतीविरोधात तक्रार करतात या नराधमाला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंडे यांनी यानंतर आरोपी अमर उर्फ रंगनाथ चंद्रशेखर दाताळ त्याच्या गावी चौकशी केली असता धक्कादायक माहिती पुढे आली. या आरोपीविरोधात लातूर येथे 2014 मध्ये ए.टी.एम फोडण्याचा गुन्हा दाखल आहे. गेली सहा वर्षांपासून लातूर पोलिस त्याचा शोध घेत असून तो फरार झाला होता. मात्र बलात्काराच्या गुन्ह्यात तपास करताना हा तोच फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून बारामती चे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व पोलीस हवालदार संजय मोहिते यांनी आरोपीच्या मूळ गावाकडे सरपंच, पोलिस पाटील, बीट अंमलदार व लातूर ग्रामीण पोलीस यांचा यांच्याकडून माहिती गोळ्या करत या सराईत आरोपीचा पर्दाफाश केला आहे

Post a Comment

أحدث أقدم