बारामतीदि(:१०) बारामती तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या उपाध्यक्षपदी कुमारी पुर्वा रमेश जाधव यांची निवड करण्यात आली आहे . कृषी पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश कडूस पाटील यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र कृषी पदवीधर संघटना ही महाराष्ट्रातील कृषी व संलग्न पदवीधर बांधवांची सर्वोज्ञ संघटना असून माझ्यावर टाकलेल्या या विश्वासाला पात्र राहून तालुक्यातील पदवीधर युवक,युवती , विद्यार्थी ,शेतकरी , तसेच कृषी विषयक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेऊन संबंधितांना न्याय मिळवून देणार असल्याचे नवनिर्वाचित युवती उपाध्यक्षा पूर्वा जाधव यांनी यावेळी सांगितले. बारामती तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारामती तालुका कृषी पदवीधर संघटनेच्या उपाध्यक्षपदी पूर्वा जाधव . सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق