बारामती(दि११)  बारामती तालुक्यात आज आणखी १२२ कोरोना रुग्णांची  वाढ झाली आहे.  बारामतीमध्ये जनता कर्फ्यू लावाला असतानासुद्धा कोरोनाची वाढ होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सहकार्य करावे असे प्रशासनामार्फत सांगण्यात आले आहे.
दिनांक 09/09/20 चे प्रतीक्षेत असलेले 82 नमुने पैकी 12 जण पॉझिटिव्ह आले आहेत  तर कालचे एकूण rt-pcr नमुने 285 घेतले होते यातील पॉझिटिव्ह रुग्ण 47 तर प्रतीक्षेत 119 आहेत. कालचे एकूण एंटीजन नमुने 152 घेतले होते. यामध्ये  पॉझिटिव्ह 63 आले आहेत      काल दिवसभरातील एकूण पॉझिटिव्ह 12+ 47 + 63 असे 122 रुग्ण आढळुन आले आहेत यामध्ये शहरातील 64  तर ग्रामीण भागातील 58 रुग्ण आहेत. बारामतीची एकूण रूग्णसंख्या आता1889 झाली असून एकूण बरे झालेले रुग्णांची संख्या  781 झाली आहे व   एकूण मृत्यूची संख्या 52 झाली असल्याचे तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी सांगितले आहे 

Post a Comment

أحدث أقدم