वडगाव निंबाळकर:(दि१०) नीरा बारामती महामार्गावर को-हाळे  बुद्रुक पेशवेवस्तीनजिक मंथन पेट्रोल पंपासमोर वडाचे मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने महामार्ग बंद झाला आहे. बारामती तालुक्यात जनता  कर्फ्यू असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त नसल्याने  मोठा अनर्थ टळला आहे . मात्र या मार्गावरील अत्यावश्यक सेवासुद्धा आता बंद झाली आहे . या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून नीरा बारामती महामार्गावरील धोकादायक झाडे काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने ही धोकादायक झाडे कधीही रस्त्यावर कोसळू शकतात यामुळे प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन या मार्गावरील धोकादायक झाडे काढावीत अशी मागणी नागरिक करत आहेत. यासंदर्भात बांधकाम विभागाचे उपअभियंता खोसे साहेब यांच्याशी संपर्क साधला असतात. या ठिकाणी यंत्रणा पाठवली असून लवकर वाहतूक सुरळीत होईल  व  इतरही धोकादायक झाडे काढली जातील असे सांगितले आहे . 

Post a Comment

أحدث أقدم