बारामती: बारामतीमध्ये आज आणखी सहा रुग्ण कोरोनाग्रस्त आढळुण आले आहेत. सकाळी 101 नमुन्यांपैकी 80 जण निगेटिव आले असून 9 प्रलंबित नमुन्यांचा अहवाल आला आहे. यामध्ये सहा जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बारामती शहरातील 68 वर्षीय महिला, गुणवडी तील 26 वर्षीय युवक, उर्जा भवन येथील वीस वर्षीय युवती, बारामती शहरातील 43 वर्षीय महिला , मोरेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष व बारामती शहरातील 36 वर्षीय पुरुष या रुग्णांचा समावेश आहे. आता बारामतीतील रुग्ण संख्या 257 झाली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post