सोमेश्वर नगर : हेमंत गडकरी
भाटघर, नीरा-देवघर,वीर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आज दिवसभर पाऊस सुरु असल्याने धरणांमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने वीर धरणातून नीरा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग आज (शनिवार) सायंकाळी वाढविण्यात असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी सांगितले.
नीरा-देवघर धरण पाणलोट क्षेत्रात आज सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ६५ मि. मी. एकूण १३२४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
वीर धरण पाणलोट क्षेत्रात आज सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत १६ मि. मी. एकूण ४०२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
भाटघर धरण पाणलोट क्षेत्रात आज सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ६८ मि. मी. एकूण २२८६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
बाणगंगा धरण पाणलोट क्षेत्रात आज सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत ७ मि. मी. एकूण ३३३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
भाटघर, वीर, नीरा-देवघर धरण पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस सुरु असल्याचे वरील आकडेवारी पाहता स्पष्ट होत असून त्यामुळे गेल्या २/३ दिवसापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग वीर धरणातून नीरा नदीत सुरु असून नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
आज शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी वीर धरणाची सर्व ९ गेट प्रत्येकी ४ फुटाने उघडून त्यामधून ४०४६२ क्यूसेक्स आणि विद्युत गृहातून ८०० क्यूसेक्स असा एकूण ४१२६२ क्यूसेक्स विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत असल्याचे सहाय्यक अभियंता विजय नलवडे यांनी सांगितले आहे.
إرسال تعليق