बारामतीमध्ये १५ जणांचा कोरोना रीपोर्ट पॉझिटिव्ह आला असून एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. 101 संशयित नमुन्यांमध्ये नऊ अध्याप प्रतीक्षेत आहेत तर 77 जण निगेटिव्ह आढळले आहेत
व बारामती तालुक्यात पंधरा जण कोरोना बाधित आढळले असून 2 जण ग्रामीण भागातील व 13 जण शहरातील आहेत आज अखेर कोरोना रुग्णांची संख्या 251 झाली असून काल रात्री शहरातील अत्यवस्थ कोरोना ग्रस्त रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
शहरातील विवेकानंद नगर येथील तीस वर्षीय महिला, धुमाळवाडी येथील खजूर रुग्णाच्या संपर्कातील एक 29 वर्षीय पुरुष, प्रगतीनगर येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील दहा वर्षाचा मुलगा, वसंतनगर येथील चाळीस वर्षे पुरुष व तीस वर्षीय महिला, हरिकृपानगर येथील 58 वर्षीय महिला, मुजावरवाडा येथील 47 वर्षीय पुरुष, म्हाडा कॉलनी येथील 36 वर्षीय पुरुष, ढेकळवाडी येथील खताळपट्टा येथील 38 वर्षीय पुरुष, एमआयडीसीमधील साठ वर्षीय पुरूष, भोई गल्ली येथील 65 वर्षीय महिला व 40 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील 11 वर्षीय मुलगा व 70 वर्षीय पुरुष व इंदापूर रोड येथील 35 वर्षीय पुरुष रुग्णास कोरोना ची बाधा आढळली आहे.
إرسال تعليق