बारामती : बारामती मध्ये कालचे प्रतिक्षेत असलेले सोळा जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामती तालुक्यातील नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव आलेले आहेत त्यामध्ये बारामती शहरातील 5 (भोई गल्ली बारामती येथील 26 वर्षाचा व 28 वर्षाचा युवक असे दोन व रुई येथील 22 वर्षाची महिला ,जळोची येथील 45 वर्षीय महिला व जामदार रोड येथील तीस वर्षाचा पुरुष) असे शहरातील पाच व बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील 56 वर्षाचा पुरुष, शिरसुफळ येथील 72 वर्षाचा पुरुष व बराणपुर येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील दोन रुग्ण असे एकूण नऊ रुग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत. बारामतीतील  एकूण रुग्ण संख्या दोनशे एकवीस झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे .

Post a Comment

أحدث أقدم