माळेगाव प्रतिनिधी-
      सातत्याने होणा-या पावसामुळे डेंगु व मलेरिया साथीने डोके वर काढु नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे. 
     सध्या संपूर्ण देशात कोरोनाचा कहर चालु आहे.या आजाराशी लढा देण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. या आजारा सोबत सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे डेंगु व मलेरिया हे साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात तापाचे रुग्ण आढळून आले आहेत. 
      या पार्श्‍वभूमीवर सरपंच जयदीप तावरे,उपसरपंच अजित तांबोळी व ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी सर्व सदस्य व आरोग्य विभागाच्या अधिकारी यांच्याशी चर्चा करून संपूर्ण गावात औषध फवारणीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार गावातील सर्व सहा वार्ड ,वाड्या वस्त्यांवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने औषध फवारणी करण्यात आली. प्रत्येक वार्ड सदस्यांनी लक्ष घालून औषध फवारणी केली. 
     आमच्यासाठी प्रत्येक ग्रामस्थाचे आरोग्य महत्वाचे असुन साथीचे आजार होऊ नये यासाठी औषध फवारणी करण्यात आली असे उपसरपंच अजित तांबोळी यांनी सांगितले. 

Post a Comment

أحدث أقدم