को-हाळे बु : बारामतीमध्ये आणखी ५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले असल्याची माहीती डॉ मनोज खोमणे यांनी दिली आहे.  कालचा उर्वरित 67 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी 62 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून वडगाव निंबाळकर येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण तसेच मुढाळे येथील  एक रुग्ण व शहरातील गुणवडी चौक येथील रुग्णाच्या संपर्कातील एक रुग्ण, तसेच बारामती शहरातील  दोन रुग्ण असे एकूण पाच रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत व आजची दिवसभराची पॉझिटिव्ह  रुग्ण संख्या 26 झाली असून एकूण बारामतीतील रुग्णसंख्या 411 झालेली आहे.

Post a Comment

أحدث أقدم