बारामती: बारामती शहर व तालुक्यातील उर्वरित 9 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी बारामती तालुक्यातील व शहरातील सात रुग्ण  पॉझिटिव्ह आढळून आले असून इतर तालुक्यातील दोन रुग्ण पॉझिटिव्हआलेले आहेत बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या दिवसभरातील  आठ व एकूण 139 झाली आहे.पॉझिटिव्ह आढळून आलेले मध्ये टीसी कॉलेज जवळील एक रुग्ण पाटस रोड येथील एक रुग्ण व फलटण रोड येथील रुग्ण असे शहरातील तीन व राजबाग काळखैरेवाडी  येथील एक रुग्ण का-हाटी येथील एक रुग्ण व सावळ येथील एक रुग्ण व बारामती हाॅस्पिटल येथे काम करणारा  गुणवडी येथील एक कर्मचारी असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.तसेच ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या सांगवी येथील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झालेला आहे.
तरी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असून सर्वांनी नियमाचे काटेकोर पालन करावे व  काही त्रास जाणवल्यास लगेच शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आव्हान तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी केले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post