बारामती; दि११: बारामतीमध्ये आज दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याची माहिती डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिले आहे . यामध्ये शहरातील एक व ग्रामीण भागातील एक रुग्ण आहे . काल एकूण 42 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून आठ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे व बारामती तालुक्यातील सांगवी येथील 26 वर्षाचा पुरुष व राम गल्ली येथील पन्नास वर्षाची महिला असे दोन रुग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत. बारामतीची रुग्णसंख्या 279 झाली आहे. दिवसेन दिवस बारामतीमध्ये कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे असे आव्हान आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
सांगवी येथील युवकास कोरोनाची लागन: तालुक्याची रुग्णसंख्या २७९. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق