को-हाळे बु। : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हायचेअरमन व को-हाळे बु। गावचे प्रसिद्ध बागायदार रामचंद्र (बापू) भगत यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर २७ वर्ष संचालक म्हणून तर १०वर्ष व्हाईसचेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले. सहकारातील ज्येष्ठ नेते म्हणून तालुक्यात भगत बापू यांना ओळखले जात होते. त्यांच्या मागे दोन मुले , पुतने,सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे.आज ठिक १:३० वाजता त्यांच्यावर को-हाळे बु। येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन व विद्यमान संचालक सुनील (तात्या) भगत यांचे ते चुलते होत.त्यांच्या निधनाने को-हाळे बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.
सोमेश्वर कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन रामचंद्र (बापू )भगत यांचे दुःखद निधन. सा. बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق