गुणवडी येथील रुग्णाचा उपचारादरम्यान पहाटे मृत्यू
प्रतिनिधी - सुरज देवकाते
बारामती -
बारामतीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होत चाललेली आहे.
भिकोबा नगर येथील रुग्णाचा रात्री उशिरा मृत्यू झाला तर आज गुणवडी येथील रुग्णाचा पहाटे मृत्यू झालेला आहे.
काल दुपारपर्यंत पाठवलेल्या 53 स्वॅब नमुन्यांपैकी एकूण 50 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 49 अहवाल निगेटिव्ह आले असून गुणवडी येथील 64 वर्षे वयाच्या पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. व तीन अहवाल प्रतीक्षेत आहेत तसेच गुणवडी येथील ज्या रुग्णाचाअहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्याचा पहाटे मृत्यू झालेला आहे. व उपचार घेत असलेल्या भिकोबा नगर येथील रुग्णाचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यानी दिली.
Post a Comment