को-हाळे बुद्रुक :-रयत शिक्षण संस्थेचे श्री सिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज को-हाळे बुद्रुक चा विज्ञान शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून या विद्यालयाने या वर्षी ही उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. रयत शिक्षण संस्थेचे मा.जनरल बॉडी सदस्य व माजी जि. प. अध्यक्ष सतीश खोमणे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य रामदास शंकरराव पेशवे, नंदकुमार लक्ष्मण मोरे, प्राचार्य शिवाजी गावडे, पर्यवेक्षक एस. डी. निगडे, प्रा. समीर गदादे, यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयांमध्ये कु. ज्ञानदा किशोर खोमणे 67.69, 2)राजेश अंकुश शिंदे 62.15 3)अभिजीत दिलीप चव्हाण 59.5% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
إرسال تعليق