बारामती : दि १६ : बारामतीत आज तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने प्रशासन मात्र सतर्क झाले आहे. १५ जुलैपासून बारामती पूर्ण लॉक डाउन करण्यात आली आहे. काल दहा जणांचे रिपोर्ट येणे बाकी असलेल्यापैकी तिघांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर सात जणांचा रिपोर्ट निगेटिव आला आहे.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक २४ वर्षे वयाचा रुग्ण सूर्यनगर येथील असून दुसरा रुग्ण देसाई इस्टेट येथील १८ वर्षाचा आहे तर तिसरा रुग्ण हा नांदेड येथिल ३३वर्ष वयाचा ड्रायव्हर जो दोन दिवसांपूर्वी बारामतीला आला होता. आज ४६ स्वब नमुने तपासणीला घेतले होते त्यापैकी २८ निगेटिव्ह आले असून १८ नमुने यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे .अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.
बारामतीत तिघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह. सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
Comments
Post a Comment