प्रतिनिधी - सूरज देवकाते
बारामती -
सोशल मिडीयाच्या माध्यमातुन ओळख झालेल्या व्यक्तींच्या भूलथापांना बळी पडू नका. सोशल मिडीयाचा वापर मर्यादित व सुरक्षितपणे चांगल्या हेतूकरिता करण्यात यावा असे आव्हान उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले आहे.
कोरोना संसर्ग महामारीच्या ( लॉकडाउनच्या कालावधीत ) काळात नागरीकांना घरात रहावे लागले . त्यामुळे घरात नुसत बसून बोर होण्यापेक्षा लोकांकडून सोशल मिडीयाचा वापर मोठया प्रमाणात करण्यात आलेला आहे.त्यातूनच तरूण मुलामुलींच्या फेसबुक , व्हॉटसअॅप . इंस्टाग्राम , व्टिटर , टिकटॉक तसेच अन्य सोशल मिडीयाच्या या वापरातून अनोळखी लोकांची ओळख होवुन त्यातुन मैत्रीचे संबंध निर्माण झाले आहे . अनोळखी मैत्री झालेल्या व्यक्तींबरोबर यातूनच भावनिकता निर्माण होवून तरूण तरूणींनी आपले वैयक्तिक फोटो , बॅक डाटा , सोशल मिडीयाचे आयडी व पासवर्ड असे प्रायव्हसी असलेल्या गोष्टी शेयर केल्या आहेत . आणि याचाच फायदा घेत पुढच्या अनोळखी मैत्री ठेवलेल्या व्यक्तीकडून फोटों , बॅक डाटा , आयडी व पासवर्ड यांचा वापर करून अश्लिल फोटो तयार करून बदनामी करण्याची धमकी देवुन पैसे उकळणे , शारिरीक संबधाची मागणी करणे यासारखे सायबर काईमचे प्रकार घडल्याचे निदर्शनास आले आहे .
 अशा प्रकारचे बारामती शहर व बारामती तालुका पोलीस ठाणे मध्ये दोन गुन्हे दाखल झाले असुन त्यामधील आरोपीस अटक देखील करण्यात आलीआहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरिता आपण स्वतः सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी. तसेच भविष्यात इथून पुढे आपल्यासोबत किंवा आपल्या मूलामुलीसोबत असा प्रकार घडल्यास पालकांनी न घाबरता पुढे येवून तात्काळ संबधित पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी यांचेकडे संपर्क साधुन तक्रार नोंदवावी . असे जाहीर आव्हान देखील बारामती पोलीस उपविभागातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم