मांजरी बु:(दि९):  सध्याच्या काळातील ग्लोबल वॉर्मिंगचे संकट लक्षात घेता प्रत्येकाने नियमितपणे वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन केले पाहिजे असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांनी व्यक्त केले.
            सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय, मांजरी बु.,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी, व्हर्चुअल वारी अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविली व निर्मल वारी विषयी जनजागृती केली.  या निमित्ताने महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालय परिसरामध्ये कडुलिंब, बदाम, चिंच यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रितेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयोचे विभागीय समन्वयक प्रा.केतन डुंबरे यांनी या उपक्रमांचे आयोजन केले होते. या उपक्रमांमध्ये कोमल शेंडे, काजल बोरा, मानसी कुलकर्णी, मंगेश दराडे, चैतन्य बिडकर, मानसी सावंत, श्रद्धा पडवळ, पवन मगर, सेबेस्टियन डीक्रुझ, स्वप्निल वाघ, वैभव कड या विद्यार्थ्यांनी सक्रिय  सहभाग घेतला होता.
      याप्रसंगी प्रा.दिपक पाटील, प्रा.केतन डुंबरे, मदन वैद्य, सोमनाथ गलांडे, प्रशांत लोंढे, अजित गुंड, संतोष पवार, संतोष घोरपडे, मनोज सुतार, तानाजी नांदे उपस्थित होते.

 

Post a Comment

أحدث أقدم