मोरगांव  : बारामती तालुक्यातील आंबी बुद्रुक येथील सोमेश्वर विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे .शंभर टक्के निकालाची परंपरा सलग तीन वर्षे विद्यालयाने कायम ठेवली असून याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे.
 शालांत माध्यमिक परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने घोषित झाला. यामध्ये सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे  आंबी  बुद्रूक ता . बारामती येथील  सोमेश्वर  विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला आहे . यामध्ये अर्पिता बाळासो जराड ९२ . ४0 टक्के  गुण मिळवुन प्रथम क्रमांक  , साक्षी  विजय गाढवे ८८ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक  ,  तर  गौरी  लालासो गायकवाड ८७ .६०  टक्के  मिळवुन तृतीय क्रमांक पटकविला .
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप सचीव भारत खोमणे , मुख्याध्यापक मोहनदास  बाबर  सरपंच प्रवीण शिर्के  व  शिक्षकांनी अभीनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

Previous Post Next Post