बारामती :बारामतीमध्ये  आणखी तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे.  काल एकूण 53 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 46 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. व चार जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे ,पॉझिटिव आलेल्या तीन जणांमध्ये भीम नगर बारामती येथील तीस वर्षाची महिला तसेच पतंग शहा नगर येथील 25 वर्षाचा युवक व निरावागज येथील पन्नास वर्षाच्या पुरुषांचा समावेश आहे बारामतीमधील एकूण रुग्णांची संख्या 127 झालेली आहे त्यामधील 62 रुग्ण बरे झालेले आहेत व चोपन्न रुग्ण उपचार खाली आहेत एकूण अकरा मृत्यू झालेले आहेत.

Post a Comment

أحدث أقدم