मोरगांव : शालांत माध्यमिक परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यामध्ये मोरगाव ता. बारामती येथील श्री मयुरेश्वर  माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६ . ७४  टक्के लागला असून  प्रथम तीनही क्रमांक मुलींनी पटकविले आहे .   विद्यालयातील तेजल शरद शिवतारे या विद्यार्थीनीला  गणित विषयामध्ये शंभर पैकी शंभर गुण  मिळवुन  क आहे .
शालान्त माध्यमिक परीक्षेचा निकाल आज ऑन लाईन पद्धतीने जाहीर झाला . यामध्ये  मुलींनी सलग तीन क्रमांक पटकावुन  बाजी मारली . यामध्ये  कु. तेजल शरद शिवतारे  ५०० पैकी ४८१  गुण मिळवून ९६.२० टक्के मिळवले.  विद्यालयात हीने प्रथम क्रमांक मिळवला आहे . तसेच   कु. आकांक्षा यज्ञेश्वर धारक  ९४.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक  तर कु. अस्मिता विजय नेवसे  ९३.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकविला आहे .
 विद्यालयात इयत्ता १० वी परीक्षेसाठी बसलेल्या १२३ विद्यार्थ्यांपैकी ११९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत . तर  विद्यालयातील तेजल शरद शिवतारे या विद्यार्थीने गणित विषयामध्ये १०० पैकी शंभर गुण मिळवले आहेत . यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य दत्तात्रय पांढरे  पर्यवेक्षक भालचंद्र बिराजदार व गावचे सरपंच निलेश केदारी यांनी अभीनंदन केले . या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी स्कुल कमीटीच्यावतीने शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

أحدث أقدم