बारामती:  बारामती मध्ये काल  एकूण 59 स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी 54 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये बारामती शहरांमधील चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या मध्ये खंडोबा नगर मधील रुग्णाच्या संपर्कातील तिची 65 वर्षाची आई तसेच  मुक्ती अपार्टमेंट कसब्या मधील रुग्णाच्या संपर्कातील 24 वर्षाची महिला व सूर्य नगरी येथील रुग्णाच्या संपर्कातील 31 वर्षाचा पुरुष व संघवी पार्क बारामती येथील 32 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे अजून पाच अहवाल प्रतीक्षेत आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांनी दिली आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post