बारामती : उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नारायण शिरगावकर यांना गोपणीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार बारामती तालुका पोलीस ठाणे हददीत तांदुळवाडी निर्मळ वस्ती येथे इसम नामे सतिश विष्णु लोंढे रा.तांदुळवाडी निर्मळवस्ती, ता. बारामती जि. पुणे हा त्याचे स्वामी समर्थ किराणा दुकानामध्ये बेकायदा बिगरपरवाना देशी विदेशी दारुची विकी करीत आहे अशा बातमीवरुन सदर ठिकाणी छापा टाकला असता नमुद इसम हा देशी विदेशी दारुचा साठा करुन विक्री करीत असताना एकूण ५०,०६८ रुपयेचे मुददेमालासह मिळून आला. त्याचेविरुध्द बारामती तालुका पोलीस ठाणेस दारुबंदी व कोरोना विषाणुचे अंतर्गत अधिनियमाखाली गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई अपर पोलीस अधिक्षक श्री. मिलिंद मोहिते सो यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पो.हवा.सुरेश भोई, तानाजी गावडे, पो.ना. रमेश केकाण, आप्पा दराडे,वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लाळगे, शरद गावडे, पो.कॉ.श्रीकांत गोसावी मपोना लता हिंगणे, जयश्री गवळी यांनी केलेली
आहे.
إرسال تعليق