माळेगाव प्रतिनिधी- 
    पंधरा ते वीस वर्षापासून विकासा पासुन  वंचित  असलेल्या ढगाई नगर व भिलारे वस्ती मधे अंतर्गत डांबरीकरण कामाचा शुभारंभ झाल्याने ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून सरपंच जयदीप तावरे व पदाधिकारी  यांचे स्वागत केले. 
     माळेगाव येथील  वाॅर्ड क्र. 3 मधे ढगाई नगर व भिलारे वस्ती या ठिकाणी वेगाने नागरिकरण होत आहे.हा भाग मुलभुत सुविधा  पासुन गेली पंधरा ते विस वर्षापासून वंचित  होता.सरपंच  जयदीप  तावरे  व सदस्या मंगल लोणकर  यांच्या  प्रयत्नातून प्रथम  गौज खनिज प्रतिष्ठान अंतर्गत भुयारी गटरचे काम पुर्ण केले.
    यानंतर सुमारे पंचवीस लाख रुपयांच्या अंतर्गत डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सदस्या मंगल लोणकर व अनिल  लोणकर  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच जयदीप तावरे,उपसरपंच अजित तांबोळी,राजाभाऊ खरात  व ग्रामस्थ उपस्थित होते. 
     सरपंच जयदीप तावरे व सदस्या मंगल लोणकर यांनी दिलेल्या शब्द पाळल्याने आमचे  समाधान झाले असे ग्रामस्थांनी सांगितले.  

Post a Comment

Previous Post Next Post