माळेगाव प्रतिनिधी- 
  राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे. कोरोनात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.या पार्श्वभूमीवर भिम योध्दा गृपने रक्तदान शिबीर आयोजित करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे असे प्रतिपादन उपविभागीय  पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी केले.
  मेडद ता.बारामती येथे भिम योध्दा गृपने रक्तदान शिबीर आयोजित केले होते. या शिबिराचे उध्दाटन उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकरयांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डाॅ.पांडुरंग गावडे,नगरसेवक गणेश सोनवणे,सरपंच राजेंद्र जगताप,   सागर गायकवाड,रोहित लोंढे,संग्राम भोसले,गणेश कदम आदी उपस्थित होते.
  या शिबिरात 51 रक्तदात्यांकडून रक्तदान करण्यात आले.लेट माणिकचंद चंदुलाल ब्लड बॅकेच्या वतिने डाॅ.टुले यांनी संकलन केले.
   या कार्यक्रमाचे आयोजन भिम योध्दा गृपचे संस्थापक सिताराम कांबळे यांनी केले होते. सुत्रसंचालन योगेश भोसले तर आभार अजित कांबळे यांनी मानले.
  

Post a Comment

أحدث أقدم