प्रतिनिधी - सूरज देवकाते
बारामती -;
धक्कादायक ! आज बारामतीत एकाच दिवशी नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे . नऊ जनांचा आव्हाल हा पॉझिटिव आला आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाला आहे. बारामतीतील कोरोनाचा आकडा हा ४९ वर पोहचला आहे.
बारामतीचा वसंत नगर भागातील तब्बल पाच जणांना कोरोनाची लागण झाली असून , लासुर्णे येथील दुसऱ्या एका परिचारिकेच्या श्रीराम नगर येथे राहणाऱ्या पतीसही कोरोनाची लागण झाली आहे , तर गुणवडी चौकातील शाहू कॉम्प्लेक्स येथे एक , रुई येथील एक तर जळोची तील मृताच्या कुटुंबाच्या संपर्कातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे.अशाप्रकारे नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही बातमी बारामती करांसाठी धक्कादायक आहे.आरोग्य विभाग देखील या अहवालामुळे हादरला आहे.
बारामती मध्ये दररोज नव्याने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आता बारामती पुन्हा एकदा लॉकडाऊन करावी अशी चर्चा चालू आहे. अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे . मास्कचा वापर करावा , सामाजिक आंतर पाळावे व वारंवार हातधुणे व सनिटायझरचा वापर करावा. असे आव्हान देखील प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
إرسال تعليق