बारामती:  येथील स्काय ॲग्रोच्या वतीने सामाजिक जबादारीचे भान जपत  COVID-19 च्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड19 साठी २१ हजारांचा मदतीचा धनादेश बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकड़े सुपुर्द करण्यात आला.
                  महाराष्ट्र कोरोना मुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने उपाययोजना सुरू आहेत.याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत या लढ्यासाठी मदत म्हणून मुख्यमंत्री साह्यता निधी कोविड19 साठी एकवीस हजार रुपयांचा धनादेश पवार यांच्याकडे स्काय अॅग्रो मार्फत सुपूर्द करण्यात आला .
    स्काय ॲग्रो  कंपनी नेहमीच  सामाजिक कार्यात अग्रेसर असते.यापूर्वीही स्काय ॲग्रो च्यावतीने कोविडच्या-19 विरोधात लढणाऱ्या कोविड योध्यासाठी फेसशील्ड मास्क चे वाटप केले होते.
    या वेळी स्काय ॲग्रोचे योगेश राऊत, केतन भोंगळे,सुनील टिळेकर, उमेश पांढरे,अभिजित बोरा उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post