बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आज 21 वा वर्धापन दिन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक तरुणांना पक्षामध्ये मनाचे स्थान दिले आहे आहे. शरद पवार साहेबांनी पक्ष स्वबळावर आज महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक आरोप-प्रत्यारोप, टिका-टिप्पण्या सहन करत आजही तितक्याच ताकदीने पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका पक्षनिरीक्षक बापूराव सोलनकर यांनी आपले मत व्यक्त केले.
प्रत्येक समाज घटकाला न्याय देणारा “राष्ट्रवादी पक्ष” आज सर्वात तरुण पक्ष आहे. पक्षातील वरिष्ठ नेते सामान्य कार्यकर्त्यांसोबत थेट जुळतात हे वेगळेपण असणारा हा एकमेव पक्ष आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व या पक्षाची विचारधारा या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुढे नेणारी आहे.
आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी पक्ष अधिकाधिक बुलंद व मजबुत होत राहील, याबाबत हितशत्रूंच्या मनात देखील शंका नाही. गोरगरीबांचा हक्काचा पक्ष आहे.
सार्वजनिक जीवनात वावरत असताना यश-अपयश हे येत असतेच. मात्र या साऱ्यातून उठून उभे राहणे शरद पवार साहेब यांच्याकडून शिकले पाहिजे  पवार साहेबांच्या संकल्पनेतून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन होऊन या आघाडीचे सरकार विराजमान झाल्याने या दिवसाला विशेष महत्त्व होते. राज्यात 'आपले सरकार' आल्याचा उत्साह कार्यकर्त्या मध्ये मोठ्या प्रमाणात आहे
आपण ज्या माणसांच्या परिवर्तनासाठी, त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी लढतोय त्यांची शक्ती आपल्याला मिळाली तर कोणतेही संकट आपण पार करू शकतो. पवार साहेब नेहमी आपल्या भाषणांमध्ये आपल्या भावना व्यक्त करतात  आपले जीवन हे समाजाच्या शेवटच्या माणसाच्याही उपयोगाला यायला हवं',
शेतकऱ्यांची मुले सज्ञान व आत्मसन्मानाने कशी उभी राहतील, यासाठी प्रयत्न केला पाहिजे

Post a Comment

Previous Post Next Post