माळेगाव प्रतिनिधी-
जेष्ठ लाॅड्री चालकाने प्रामाणिकपणा दाखवत खिश्यात सापडलेले साडेबारा हजार रुपये ग्राहकास परत दिल्याने दादा दळवी यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
माळेगाव येथील निरा-बारामती या रस्त्याच्या लगत दादा दळवी या जेष्ठाचे जय मल्हार लाॅड्री सेंटर आहे. ते गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहेत.याकामी त्यांना त्यांची दोन मुले मदत करतात.
ते कपड्यांची इस्त्री करताना नेहमीचे ग्राहक असणारे उद्योजक चेतन गोंडे यांच्या पॅन्टच्या खिश्यात साडे बारा हजारांच्या नोटा सापडल्या. त्यांनी तातडीने फोन करुन चेतन गोंडे यांना हि बातमी सांगितली. अखेर दुकानात येत चेतन गोंडे यांनी दादा दळवी यांच्या कडुन ते पैसे स्विकारले.यावेळी संदिप आढाव,भिमा दळवी,दिपक पवार उपस्थित होते.
दरम्यान दादा दळवी यांच्या प्रामाणिकपणाचे सरपंच जयदीप तावरे,उपसरपंच अजित तांबोळी यांनी कौतुक करुन सन्मान केला.
दरम्यान उद्योजक चेतन गोंडे यांनी बक्षीसापोटी दिलेले पैसे नाकारत मनाचा मोठेपणा दाखवुन दिला.लाॅकडाऊन धंद्याची वाईट अवस्था असताना दादा दळवीच्या प्रामाणिकपणाची गावात सर्वत्र चर्चा आहे.
कपड्यांची इस्त्री करताना यापूर्वी अनेकदा मौल्यवान वस्तू सापडल्या होत्या. ग्राहकांच्या नजर चुकीमुळे अनेकदा पैसे खिश्यात सापडतात. मात्र मी प्रामाणिकपणे ते परत करतो.
दादा दळवी- लाॅन्ड्री चालक
إرسال تعليق