माळेगाव  प्रतिनिधी- 
  माळेगाव  व परिसरात अवैध  व्यवसाय  करणा-या धंद्यावर  कारवाई  करत पोलिसांनी  3 आरोपीसह साडेपाच  हजारांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई  एकाच  दिवशी  केल्याने  अवैध  व्यवसायिंकाचे  कंबरडे  मोडले  आहे.
     जोशीवाडा  माळेगाव  येथील  आरोपी  अशोक  गणपत  घुसळकर  हा बेकायदेशीर टॅगो पंच  नावाची देशी दारु  ओळखीच्या  लोकांना  विकताना  आढळून  आला. त्यांचेवर धाड  टाकत 572/ रुपयाच्या  11 बाटल्या  जप्त  केल्या  असुन  पोलीस  काॅन्स्टेबल  नितिन  चव्हाण  यांनी  तक्रार  दिली  आहे. 
      दुष्काळी  चाळ  माळेगाव  येथे कानिफ  गंगाराम  पवार या अवैध  व्यावसायिकावर  पोलिसांनी धाड टाकत 2450/ रुपयांची  65 लिटर हातभट्टी  दारु  पकडली  आहे.याबाबत  पोलिस  काॅन्स्टेबल नितिन चव्हाण  यांनी  तक्रार  दिली आहे. 
       तसेच  दुष्काळी  चाळ माळेगाव येथे  दत्तात्रय  महादेव  गव्हाणे  या अवैध  व्यावसायिकावर  धाड टाकत 2450/ रुपयांची  30 लिटर हातभट्टी दारु पकडली आहे. याबाबत  पोलिस  काॅन्स्टेबल  योगेश  चितारे यांनी  फिर्यादी  दिली  आहे. 
     सदर तिन धाडीत  3 आरोपीसह साडेपाच  हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिन्ही  गुन्ह्यांचा  तपास  पोलिस हवालदार आबा ताकवणे हे करीत  आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post