माळेगाव  प्रतिनिधी- 
    बांधकामासाठी  कच वाहुन  नेणारा  ट्रक  चिखलात  अडकल्याने निरा- बारामती  रस्त्यावरील  वहातुक  खोळंबली  होती.पाऊण  तासाच्या  प्रयत्ना नंतर  ट्रक  चिखलातुन  काढल्यामुळे  वहातुक  सुरळीत  झाली.
     निरा  बारामती  या महत्वाच्या  राज्यमार्गालगत शनी  मंदिरा समोर  एका  बांधकाम व्यावसायिकाने  एक  ट्रक भरुन कच  आणली  होती. काही  दिवसांपूर्वी  रस्ताच्या  लगत  पाईपलाईन टाकण्यासाठी  रस्ता  खोदला  होता. काल  प्रचंड  पाऊस  झाल्याने  सर्वत्र  चिखल  झाला  होता. नेमका  याच  चिखलात  ट्रक  रुतून  बसला  होता.त्यामुळे  निरा व बारामती कडे  जाणारी  वहातुक  खोळंबली  होती. रस्त्याच्या  दुतर्फा  वहानांच्या  रांगा लागल्या होत्या.
     अखेर  मोठी क्रेन व जेसिबीच्या साह्याने  चिखलात  रुतलेला ट्रक  बाहेर  काढण्यात  आला.यानंतर  दोन्ही  बाजुची वहातुक  सुरळीत  झाली.

Post a Comment

أحدث أقدم