माळेगाव प्रतिनिधी-
सार्वजनिक ठिकाणी व प्रवास करताना मास्कचा वापर न करणा-या 36 नागरिकांना दंड आकारुन तिन हजार साहशे रुपये दंड वसुल केल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली.
पुणे जिल्हा अधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी व प्रवास करताना सर्वांना मास्क वापरणे बंधनकारक आहे.मास्क न वापरणा-या नागरिकां कडुन दंड वसूल करावा असे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत प्रशासन व पोलिस दूरक्षेत्र माळेगाव यांनी संयुक्त मोहिम राबवुन मास्क न वापरणा-या 36 जणांवर कारवाई करत सुमारे तिन हजार साहशे रुपये दंड वसूल केला.सदर कारवाईत ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे,पोलिस हवालदार आबा ताकवणे,पोलिस नाईक रमेश नागटिळक,पोलिस काॅन्स्टेबल अमोल खांडेकर,नितिन चव्हाण,योगेश चितारे,निखिल जाधव,नितिन कांबळे,होमगार्ड जवान व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केली.
दरम्यान सर्व नागरिकांनी मास्क वापरावा,सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये,सर्वांनी याचे पालन करावे अन्यथा दंड आकारला जाईल अशी माहिती ग्रामविकास अधिकारी संजय साळुंखे यांनी दिली.
Post a Comment