कोऱ्हाळे बुद्रुक - प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रूक गावातील ९० वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला.
या जेष्ठाचे कुटुंबीय पुण्याला असतात. मात्र कोरोनाचा धोका वाढल्या पासून व लॉक डाउन पासून या जेष्ठाचे कुटुंबीय गावातील एका वस्तीवर राहतात. या व्यक्ती कोठेही बाहेर गेल्याची नोंद नाही, मात्र या ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा भाजीपाल्याची वाहतूक करतो. त्याच्या वाहनाचा प्रवास आजूबाजूला झाला असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. आजच्या दोन रुग्णांमुळे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागात करोनाचा धोका वाढत चालल्याचे चित्र आहे.
إرسال تعليق