माळेगाव  प्रतिनिधी- (दि२६)
     बुधवार पासुन  माळेगाव  व परिसरातील हाॅटेल,सलुन  व पानटपरी  वगळता  सर्व  दुकाने  सकाळी  नऊ ते सायंकाळी  पाच  वाजेपर्यंत  सुरू  राहतील  अशी माहिती  सरपंच  जयदीप  तावरे यांनी  दिली. 
     देशात 22 मार्च  पासुन  लाॅकडाऊन  असल्याने  कोरोना  पासुन बचाव करण्यासाठी माळेगाव  व परिसरातील  अत्यावश्यक  सेवा वगळता  सर्व  दुकाने  बंद होती.शिवाय कोरोनाचे  दोन रुग्ण  सापडल्यामुळे गाव पुर्ण  बंद ठेवले होते.कोरोनाचा एक रुग्ण  दगावला  होतो.तर दुसरा  बरा होऊन चौदा  दिवस  पुर्ण  झाले आहेत. 
     गावातील  सर्व  व्यवहार  चालू  ठेवण्यासाठी सरपंच  जयदीप  तावरे,उपसरपंच  अजित  तांबोळी,ग्रामविकास  अधिकारी एस बी साळुंखे यांनी बैठक  घेतली. वरिष्ठ  अधिकारी यांनी दिलेल्या  सुचनेनुसार  बुधवार  27 मे पासुन  हाॅटेल,सलुन  व पानटपरी वगळता  सर्व दुकाने  सकाळी नऊ  ते  सायंकाळी पाच  वाजेपर्यंत सुरू  राहतील असा निर्णय  झाला  
       दरम्यान  सर्व  दुकाने  सुरु  करण्याचा  निर्णय घेतला  असला  तरी  ग्रामस्थांनी  आरोग्याची  काळजी  घ्यावी,मास्क वापरावा व सोशल डिस्टन्सींचे पालन करावे  असे आवाहन  सरपंच  जयदीप  तावरे यांनी केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم