को-हाळे बु।: को-हाळे बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत पेशवे वस्ती या ठिकाणी रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र (बापू )भगत यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी दत्तात्रय भगत ,सोपान भगत, विठ्ठल भगत,सुनील (तात्या) भगत, सरपंच अश्विनी गुळूंमकर ,डी.जी माळशिकारे ,मोहन भगत ,शामराव खोमणे, यांच्यासह नागरिक उपस्थित होते .चौदाव्या वित्त आयोगातून तीन लाख रुपये निधि या रस्त्यासाठी मंजूर झाला असून लवकरच हे काम पूर्ण करून हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच गुळुंमकर यांनी दिली . अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते आता या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे .
को-हाळे बुद्रुक येथे रस्ता भूमिपूजन कार्यक्रम संपन्न. - सा.बारामती दर्पण
baramati darpan
0
تعليقات
إرسال تعليق