माळेगाव प्रतिनिधी- 
     विज्ञानवादी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आजही मार्गदर्शक व प्रेरणादायी असुन आखिल विश्वाला त्यांच्या विचारांची नितांत गरज आहे असे प्रतिपादन माळेगाव पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी केले.
      रमामाता नगर येथे सामाजिक कार्यकर्ते आण्णा घोडके यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे आयोजन केले होते.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या हस्ते गौतम बुद्ध व महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी विजय भोसले यांनी धम्मवंदना व पुजापाठ घेतला.
      यावेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष भोसले,पोलिस नाईक रमेश नागटिळक,अमर विटकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
      यावेळी जयंतीनिमित्त गरजूंना सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्या हस्ते धान्य वाटप करण्यात आले.सदर धान्य शंभर कुठुंबाला वाटण्यात आले.या जयंतीचे आयोजन आण्णा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शक्ती दहिहंडी संघाचे संस्थापक विशाल घोडके,सुरज घोडके,अमोल जगताप,अनिल रणधीर,संजय वाघमारे यांनी केले होते.

Post a Comment

Previous Post Next Post