माळेगाव प्रतिनिधी-
चोरुन मुरुमाची वहातुक करताना दोन हायवा ट्रक पकडले असुन त्यांचेवर कारवाई करण्यात आली आहे.सदर घटना कांबळेश्वर -मानाप्पावस्ती शिवेवर घडली.
याबाबत अधिक माहिती देताना पणदरेचे तलाठी एल एस मुळे यांनी सांगितले की, कांबळेश्वर -मानाप्पावस्ती शिवेवर दोन हायवा ट्रक क्र. एम.एच.42 टी.0972 ( मालक सुरेश काळे) व एम.एच. 42 टी 0885( मालक संजय सुर्वे) हे बेकायदेशीरपणे मुरुम वहातुक करताना सापडले.सदरचे दोन्ही ट्रक पुढिल कारवाईसाठी वडगाव पोलिस स्टेशनमधे जमा करण्यात आले आहेत.सदर कारवाईची माहिती तहसीलदार बारामती यांना दिली आहे.
सदरची कारवाई मंडलाधिकारी रवी पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी एल एस मुळे ,अजय सोनवणे यांनी केली.
दरम्यान सदरचे आरोपी हे प्रतिष्ठीत असुन त्यांनी अधिका-यांवर राजकीय दबाव आणून कारवाई टाळण्याचा जोरदार प्रयत्न केला.मात्र तलाठी एल एस मुळे यांनी राजकीय दबाव झुगारून कारवाई केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Post a Comment